एकनाथ खडसे यांच्या मोठ्या बहीणीचे निधन, Eknath khadse sister passed away

एकनाथ खडसे यांच्या मोठ्या बहीणीचे निधन

एकनाथ खडसे यांच्या मोठ्या बहीणीचे निधन
www.24taas.com, झी मीडिया, जळगाव

विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचे पुत्र निखिल खडसे यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान दु:खावेगामुळे एकनाथ खडसेंची मोठी बहिण कमलाबाई पाटील (वय ७४) यांचे काल रात्री निधन झाले. त्यामुळे आधीच पुत्राच्या वियोगाने घायाळ झालेल्या एकनाथ खडसेंवर नियतीने दुसरा आघात केला.

निखिलच्या निधनाचे वृत्त समजल्यापासून त्या सतत रडत होत्या. कमलाबाई या दु:खातून सावरु शकल्या नाही. आणि त्यातच त्यांचे देखील निधन झाले. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. निखिल खडसे यांच्या निधनाची वार्ता कळताच संपूर्ण जिल्हा शोकसागरात बुडाला. मुक्ताईनगर व कोथळी गावात सर्व व्यवहार सकाळपासूनच ठप्प झाले
होते.

पहाटेपासुनच कोथळी येथील मुक्ताई निवासस्थानावर तालुक्यातील जिल्ह्यातील, राज्यातील पक्षकार्यकर्ते, नेथे, पदाधिकारी यांची रीघ लागली होती. बहुतांश कार्यकर्ते सायंकाळपासूनच कोथळी येथे आले होते. गुरुवारी दुपारी दीड वाजता रुग्णवाहिकेतून निखिल खडसे यांचे पार्थिव कोथळी येथे पोहचताच हजारोंच्या जनसमुदायाने शेवटचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती.

First Published: Friday, May 3, 2013, 16:42


comments powered by Disqus