ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांचे पुण्यात निधन

Last Updated: Friday, May 23, 2014, 14:45

ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांचे शुक्रवारी पुण्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षाचे होते. चौकट राजा, एक होता विदूषक, हरिश्चद्रांची फॅक्टरी, असे काही त्यांचे गाजलेले चित्रपट त्यातील गाणी आज प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

मन्ना डेंचे अ अ आई...

Last Updated: Thursday, October 24, 2013, 22:57

सुप्रसिद्ध गायक मन्ना डे यांनी चित्रपटसृष्टीत सुमारे ५० वर्षांच्या कारकिर्दीत हिंदी, मराठी, बंगाली, आसामी, मल्याळम, कन्नड, गुजराती, पंजाबी, भोजपुरी अशा विविध प्रादेशिक भाषांमधून सुमारे साडेतीन हजारहून अधिक गाणी गायली. मन्ना डे यांची मराठी गाणीही खूप गाजली आहेत.

मन्ना डे यांची गाजलेली गाणी

Last Updated: Thursday, October 24, 2013, 08:02

आपल्या जादुई आवाजाने हिंदी, बंगाली, मराठी चित्रपटसृष्टीत अधिराज गाजविणारे मन्ना डे यांचे वयाच्या ९४ वर्षी बंगळूरमध्ये निधन झाले. आजही त्यांची अनेक गाणी हिट झाली आहेत. त्यातील ४० हिट गाणी अनेकांच्या तोंडावर रेंगाळत आहेत.

प्रसिद्ध गायक मन्ना डे यांचे निधन

Last Updated: Thursday, October 24, 2013, 07:48

अजरामर संगीताने आणि जादुई आवाजाने भारतीय चित्रपटसृष्टीला अनमोल योगदान देणारे मन्ना डे यांचे बंगळुरू येथील खासगी रूग्णालयात निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.

कॉम्प्युटर माऊसचे जनक डग्लस यांचं निधन

Last Updated: Friday, July 5, 2013, 08:36

कॉम्प्युटरच्या वापरामध्ये अत्यंत महत्त्वाचा भाग असलेला आणि जगभरातल्या अनेक गोष्टी एका क्लिकवर आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या माऊसचा क्रांतिकारी शोध लावणारे ज्येष्ठ संशोधक डग्लस एंजेलबर्ट यांचं ८८ व्या वर्षी गुरूवारी निधन झालं.

राज ठाकरेंनी केले एकनाथ खडसेंचे सांत्वन

Last Updated: Sunday, May 5, 2013, 13:39

भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे कुटुंबीयांचे सांत्वन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या घरी जाऊन केले. यावेळी राज यांच्याबरोबर आमदार आणि गटनेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई उपस्थित होते.

एकनाथ खडसे यांच्या मोठ्या बहीणीचे निधन

Last Updated: Friday, May 3, 2013, 17:22

विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचे पुत्र निखिल खडसे यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.