Last Updated: Sunday, September 29, 2013, 23:02
www.24taas.com, झी मीडिया, धुळेधुळे जिल्ह्यातल्या न्याहळोद गावात ओल्या दुष्काळाला कंटाळून एका 56 वर्षीय शेतक-यानं आत्महत्या केलीये. मधुकर कोळी असं त्यांचं नाव आहे. कर्जबाजारीपणा आणि नापीकीचं संकट समोर दिसत असल्याने विष पिउन त्यांनी जीवन यात्रा संपवली आहे.
कोळी कुटुंबाची चार बिघे कोरडवाहू शेती आहे. गंभीर बाब म्हणजे गेल्या वर्षी पावसाने दगा दिल्याने दुष्काळाला कंटाळून एकट्या न्याहळोद गावात चार शेतक-यांनी आत्महत्या केल्या होत्या. तर ओल्या दुष्काळामुळे या महिन्यातीलच ही दुसरी आत्महत्या आहे.
मात्र उदासीन सरकार आणि कृषी विभागाला याचं काहीही सोयसुतक नाही. ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकर्यांनी केलीय आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, September 29, 2013, 23:02