Last Updated: Thursday, March 27, 2014, 13:30
www.24taas.com, झी मीडिया, नाशिकनाशिकमध्ये एका हॉटेलमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेत दोन जणांचा मृत्यू झालाय. त्यात हॉटेलमालकाचाही समावेश आहे. हॉटेलमध्ये बुधवारी रात्री दारु पिऊन एका गटानं गोंधळ घातला. त्यात एकाच मृत्यू झालाय.
मृत झालेल्या व्यक्तीच्या गावात ही घटना समजताच मोठा जमाव हॉटेलवर हल्ला करण्यासाठी आला. हॉटेल मालकानेच आपल्या गावातील व्यक्तीला मारल्याच्या गैरसमजूतीने हॉटेल मालकाला जबर मारहाण करण्यात आली. त्यात हॉटेल मालक सोनवणे यांचा मृत्यू झालाय.
आरती हॉटेलमध्ये काल रात्री काही तरुणांची हॉटेल मालकाशी वाद झाला. त्यानंतर यातील एका तरुणाचा मृत्यू झाला. मात्र सकाळी ही बातमी कळताच मृत तरुणाच्या संतप्त कुटुंबियांनी हॉटेलवर हल्ला केला. या हल्ल्यात हॉटेल मालक आणि आचारी यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. चौकशीसाठी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, March 27, 2014, 13:30