Last Updated: Thursday, August 15, 2013, 14:52
www.24taas.com , झी मीडिया, शिर्डी साईभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शिर्डीत साईभक्तांसाठी आजपासून मोफत बुंदी लाडूच्या प्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे. गुरुवार आणि स्वातंत्र्यदिनाचा आजचा मुहूर्त साधून दर्शन रांगेतच प्रसादाचं वाटप सुरू करण्यात आलं.
याआधी साईंच्या दर्शनासाठी तासंनतास रांगेत उभं राहून पुन्हा प्रसादासाठी रांगेत उभं रहावं लागत होतं. मात्र आता दर्शनाच्या रांगेत तसंच मोफत प्रसाद मिळणार असल्यामुळं साईभक्तांमधून आनंद व्यक्त होतोय.
मात्र याशिवाय साईभक्तांना अधिकचे लाडू पाकीट हवं असल्यास त्यांना ते लाडू विक्री काऊंटवरून २० रुपये प्रती पाकीट याप्रमाणं मिळणार आहे. साईभक्तांनी या निर्णयाबाबत आनंद व्यक्त केलाय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, August 15, 2013, 14:52