रिक्षात तरूणीवर सामूहिक बलात्कार, Gang rape at Auto in Nashik

रिक्षात तरूणीवर सामूहिक बलात्कार

रिक्षात तरूणीवर सामूहिक बलात्कार
www.24taas.com, नाशिक

गृहखातं काहीही दावे करत असले तरी महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होत नाहीयेत. हे पुन्हा एकदा नाशकात अधोरेखित झालंय. रिक्षातून प्रवास करणाऱ्या एका तरुणीवर तिच्या मित्रासमोरच सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी रिक्षाचालकासह दोघांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आलीय. मात्र रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आलाय.

रिक्षातून प्रवास करणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करणारे हेच ते तिघे नराधम.. ज्यांच्या काही तासातच पोलिसांनी मुसक्या आवळून त्यांना न्यायालयासमोर हजर केलं आणि न्यायालयाने या तिघांची रवानगी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीत केलीय. नाशिकमध्ये भंगारचा व्यवसाय करणारी तरुणी आपल्या मित्रासह काल रात्री दहाच्या सुमारास शहराच्या मध्यवस्तीतील शालीमार चौकात रिक्षाची वाट बघत उभे होती.

तेवढ्यात एक रिक्षा त्यांच्या समोर येवून उभे राहिली. शेअर रिक्षा समजून ही तरुणी आणि तिचा मित्र रिक्षात बसले पण या तरुणांनी कन्नमवार पुलाजवळ नेऊन तरुणीवर अत्याचार केले...मुलगी बेशुद्ध पडल्यानंतर तिघही रिक्षासह फरार झाले. सोबत असणाऱ्या युवकाने पोलिसांना रिक्षा क्रमांक आणि तिघा नराधमांविषयी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी शिताफीनं या तिघांना अटक केली.

याआधी नाशकात रात्रीच्या वेळी लुटीच्या घटना घडल्या होत्या..त्यानंतर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली होती...पण पोलिसांनी मोहीम मध्यंतरीच्या काळात थंडावल्यानंतर अनधिकृत रिक्षाचालकांची संख्या वाढली...त्यामुळेच हा धक्कादायक प्रकार शहरात घडलाय. त्यामुळे वेळीच या प्रवृत्तीला ठेचून काढण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेण्याची मागणी होतेय.

First Published: Friday, April 5, 2013, 23:03


comments powered by Disqus