Last Updated: Wednesday, July 24, 2013, 08:38
www.24taas.com, झी मीडिया, नाशिकनाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव तालुक्यात 24 वर्षांच्या विवाहित महिलेवर 6 जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.
या महिलेच्या भोळसट स्वभावाचा फायदा घेत आरोपींनी तीन वर्षापासून तिला धमकावीत वेळोवेळी बलात्कार केला. पीडित महिलेच्या पतीला हा प्रकार समजल्यानंतर त्याने पत्नीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता धक्कादायक माहिती समोर आली. आरोपींमध्ये तंटा मुक्ती समितीच्या अध्याक्षाचाही समावेश आहे.
पोलिसांनी या प्रकरणी २ महिलांसह ७ जणांना ताब्यात घेतलय. या प्रकरणातला एक आरोपी अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेतायत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, July 23, 2013, 23:49