Last Updated: Monday, March 4, 2013, 20:20
www.24taas.com, नाशिकनाशिकच्या सातपूर परिसरातील एका विहरीत सात वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. २३ फेब्रुवारी पासून वैष्णवी ज्ञानेश्वर मोरे ही अल्पवयीन मुलगी बेपत्ता होती.
या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीस आणि नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला मात्र मुलीचा कुठेही शोध लागला नाही. अखेर आज एका विहिरीत तिचा मृतदेह तरंगताना आढळून आला. विशेष म्हणजे, हे पडीक शेत आहे. शेतात पिकं नसल्याने शेतकरी तिकडे फिरकतही नाहीत.
मात्र आज सकाळी लाकडं गोळा करण्यासाठी शेत मालक आल्यानंतर प्रेत तरंगताना दिसलं. शेत मालकानं पोलिसात खबर दिली आणि वैष्णवीचा मृत्य झाल्याचं निष्पन्न झालं. मात्र याच नेमक कारण काय अशा अनेक प्रश्नाच्या उत्तरांचा पोलीस शोध घेत आहेत.
First Published: Monday, March 4, 2013, 20:20