Last Updated: Wednesday, May 15, 2013, 19:58
www.24taas.com, झी मीडिया, नाशिकनाशिक महापलिकेच्या सावरकर तरण तलावात गावगुंडांनी घुसून पालकांना बेदम मारहाण केली. खेळाडूंच्या स्पर्धेतून हा प्रकार उद्भवल्याचं बोललं जातंय.
तरण तलावातील खेळाडुंना प्रशिक्षण देणारे शंकर मादगुंडी यांनी चंपानेरकर यांच्या मुलाला असभ्य भाषेत रागावल्याची पालकांची तक्रार होती. या विषयी त्यांनी तरण तलावाचे व्यवस्थापकाकडे तक्रार केली होती मात्र त्यातून समाधान न झाल्याने त्यांनी आपल्या ओळखीच्या काही तरुणांना सांगून शंकर यांना जाब विचारायला सांगितलं. या तरुणांनी मागचा पुढचा विचार न करता प्रशिक्षकांना मारहाण करायला सुरवात केली. त्यांना वाचाविण्यासाठी इतर पालक मध्ये पडले. तर त्यांनाही 10-15 जणांच्या टोळक्यान बेदम चोप दिला.
या झटापटीत महिलांनाही मारहाण झाल्याने मारहाण करणा-यांना लगेच अटक करण्याच्या मागणीसाठी पालकांनी व्यवस्थापकाच्या कार्यालयातच ठिय्या मांडला अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, May 15, 2013, 19:58