गुलाबरावांवर आरोप निश्चित, खुर्ची अनिश्चित! Gulabrao Deokar in Gharkul scam

गुलाबरावांवर आरोप निश्चित, खुर्ची अनिश्चित!

गुलाबरावांवर आरोप निश्चित, खुर्ची अनिश्चित!
www.24taas.com, झी मीडिया, जळगाव

जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी पालकमंत्री आणि राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह ४८ नगरसेवकांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. तर मुख्य आरोपी आणि आमदार सुरेश जैन यांच्या गैरहजेरीबाबत २९ मे रोजी सुनावणी होणार आहे.

आजच्या आरोप निश्चितीच्या सुनावणीला देवकरांसह सर्वच्या सर्व ४८ नगरसेवक जिल्हा सत्र न्यायालयात हजर होते. आता आरोप निश्चित झाल्यामुळं गुलाबराव देवकरांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता आहे. देवकर हे घरकुल घोटाळ्यातले प्रमुख आरोपी असून तत्कालीन नगराध्यही आहेत.

29 कोटी 59 लाख रुपयांच्या या घोटाळ्यात अटक झालेले दुसरे मोठे दिग्गज आहेत. यापूर्वी शिवसेना आमदार सुरेश जैन यांना अटक करण्यात आली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, May 27, 2013, 17:08


comments powered by Disqus