सिंचन घोटाळा उघडकीस आणणारे विजय पांढरे ‘आप’मध्ये!Vijay Pandhare enters in politics, join AAP

सिंचन घोटाळा उघडकीस आणणारे विजय पांढरे ‘आप’मध्ये!

सिंचन घोटाळा उघडकीस आणणारे विजय पांढरे ‘आप’मध्ये!
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक

सिंचन घोटाळ्याचा पर्दाफाश करणारे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय पांढरे राजकारणात एंट्री मारणार आहेत.. लवकरच ते आम आदमी पक्षात प्रवेश करणार आहेत..

पांढरे ३० नोव्हेंबरला निवृत्त होतायत.. पांढरेंच्या प्रवेशामुळं महाराष्ट्रात आम आदमी पक्षाचं वजन वाढणार आहे.. त्यांच्या राजकारणातल्या प्रवेशामुळं सिंचन घोटाळ्यातील काही गुपितं बाहेर पडण्याची शक्यता आहे.

त्यामुळं आगामी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जातेय. विशेष म्हणजे सिंचन घोटाळ्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त बसण्याची शक्यता आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, November 23, 2013, 10:25


comments powered by Disqus