‘खाप’पंचायतीचा जाच, तरुणीला वृद्धाशी संसार थाटण्याची सक्ती!`Khap` Panchayat torment, Minor Girl for

‘खाप’पंचायतीचा जाच, तरुणीला वृद्धाशी संसार थाटण्याची सक्ती!

‘खाप’पंचायतीचा जाच, तरुणीला वृद्धाशी संसार थाटण्याची सक्ती!
www.24taas.com, झी मीडिया, श्रीरामपूर, नगर

खाप पंचायतीचा जाच अनेक कुटुंबांना सहन करावा लागतोय. पंजाब, हरियाणसारख्या राज्यांमध्ये तर या घटना सर्सास होतांना दिसतात. मात्र पुरोगामी महाराष्ट्रातही ‘खाप’चा आतंक पाहायला मिळतोय. खापमुळं एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६२ वर्षीय वृद्धासोबत एक दिवसाचा संसार थाटण्याची वेळ आलीय.

श्रीरामपूरच्या एका अल्पवयीन मुलीला खापचा फटका बसलाय. १७ वर्षांच्या या अल्पवयीन मुलीवर ६२ वर्षांच्या वृद्धाशी संसार करण्याची सक्ती वैदू समाजाची जात पंचायत करतेय. स्वत:च्याच मुलीचा बळी घेतल्याबद्दल ताया लोखंडे हा जन्मठेप भोगून आला एक ६२ वर्षीय वृद्ध आहे. त्याच्यासोबत नांदायला जाण्याची सक्ती या मुलीला जात पंचायतेनं केली आहे.

१४ वर्षांपूर्वी तायानं आपल्याच मुलीची हत्या केली होती. त्यानंतर तो तुरुंगात असताना त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. त्यावेळी तिच्या ४ वर्षांच्या लहान बहिणीसोबत तायाचं लग्न करण्याचा आदेश जातपंचायतीनं दिला होता. आज हीच मुलगी १७ वर्षांची झाली आहे. त्यामुळं ६२ वर्षांच्या या तायासोबत तिनं किमान एका रात्रीसाठी तरी नांदायला जावं असं फर्मान वैदू समाजाच्या जातपंचायतीनं काढलंय.

पीडित मुलीचे आजी-आजोबा मागील १५ वर्षांपासून जातपंचायतीच्या या आदेशाविरोधात लढा देत आहेत. पण पंचायत त्यांना दाद देत नाही. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिलाय. पण जात पंचायतीच्या दबावामुळं पीडित कुटुंब पोलीस तक्रार करण्यास बिचकत आहेत. त्यामुळं आता या अल्पवयीन तरुणीला कसं वाचवायचं असा प्रश्न सर्वांपुढं आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, December 29, 2013, 17:22


comments powered by Disqus