Last Updated: Friday, June 14, 2013, 20:55
www.24taas.com, झी मीडिया, नाशिकनाशिकमध्ये अपहरण झालेल्या बिपीन बाफनाचा मृतदेह अखेर सापडलाय. निफाड रस्त्यावर विंचूर गवळी शिवारात त्याचा मृतदेह सापडलाय. एक कोटीच्या खंडणीसाठी त्याचं अपहरण करण्यात आलं होतं.
बिपीन हा ओझरच्या धान्य व्यापा-याचा मुलगा आहे.चार पाच दिवसांपासून तो त्याच्याशी कुटुंबियांचा काहीही संपर्क होत नव्हता.
बेपत्ता होण्यापूर्वी डान्स क्लासला जातो असं सांगून बिपीन नाशिकला निघाला होता. त्यानंतर रात्री मित्राकडेच मुक्काम करत असल्याचंही त्यानं कुटुंबियांना कळवलं. त्यानंतर त्यानंतर तो बेपत्ता झाला. आज अखेर त्याचा मृतदेह मिळालाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, June 14, 2013, 20:55