पोलीस दलातील महिलाही असुरक्षितच!, Lady Police faces molestation

पोलीस दलातील महिलाही असुरक्षितच!

पोलीस दलातील महिलाही असुरक्षितच!
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कडक पावलं उचलण्याचे आदेश गृहमंत्री आर आर पाटलांनी दिलेत खरे, मात्र पोलिस दलातल्याच महिला कर्मचारी सुरक्षित नसल्याचं समोर आलंय.

लाच लुचपत प्रतिबंध विभागात काम करणा-या एका महिला कर्मचा-याला अश्लिल बोलणं आणि मानसिक त्रास दिल्याच्या कारणावरून महेंद्र पवार या अधिका-याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा नोंदवण्यात आलाय. समाजातल्या इतर महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्या विभागावर आहे त्याच विभागातल्या कर्मचारीच जर सुरक्षित नसतील तर या पोलीस दलाकडून महिला काय अपेक्षा ठेवणार असा प्रश्न निर्माण झालाय.

त्यामुळे आता गृहखातं महेंद्र पवार या अधिका-यावर कारवाई करत ही विश्वासार्हता परत मिळवणार का हाही प्रश्न विचारला जातोय...


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, October 7, 2013, 23:07


comments powered by Disqus