महाराष्ट्र भारनियमन मुक्त झाला – अजित पवार, maharashtra became load shedding free - ajit pawa

महाराष्ट्र भारनियमन मुक्त झाला – अजित पवार

महाराष्ट्र भारनियमन मुक्त झाला – अजित पवार

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महाराष्ट्र राज्य हे भारनियमन मुक्त झालं असून येणाऱ्या काळत वीज चोरी थांबल्यास राज्यात सर्वत्र २४ तास वीज देणार असल्याचा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच उर्जामंत्री अजित पवार यांनी केलाय.

धुळे जिल्ह्यातल्या शिवाजीनगर इथं उभारण्यात आलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या सौर उर्जा त्यांनी भेट दिली. महाराष्ट्र राज्य वीजेच्या बाबतीत परिपूर्ण करण्याचा प्रयत्न होत आहे.

येणाऱ्या काळात पिक अवर व्यतिरिक्त इतर राज्यांना वीज विकणार असल्याचं ही ते यावेळी म्हणाले. एकूणच निवडणुका जवळ येत असल्यानं अजितदादांनी आता मतदारांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने सरकारच्या कामकाजाचे गोडवे गायला सुरुवात केली आहे. मात्र प्रत्यक्षात राज्य खरोखर भारनियमुक्त होईल का हे पाहणं गरजेचं आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, June 2, 2013, 14:15


comments powered by Disqus