Last Updated: Friday, November 15, 2013, 12:14
www.24taas.com, झी मीडिया, नाशिकमुंबईकडे येणाऱ्या मंगला एक्स्प्रेस अपघातात पाच ठार झालेत. इगतपुरी येथे मंगला एक्स्प्रेसचे चार डबे रुऴावरुन घसरल्याने हा अपघात झाला.
इगतपुरी येथील घोटी या ठिकाणी एक्स्प्रेसचे डबे घसरल्यामुळे नाशिक - मुंबई मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच, या अपघातात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या अपघातामध्ये पाच जणांना मृत्यू झाला. तर ४५ जण जखमी झाले आहेत.
मंगला एक्सप्रेस दिल्लीहून एर्नाकुलम येथे जात होती नाशिक येथील घोटी येथे आली असताना चार डबे रूळावरून सकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान घसरलेत. त्यामुळे मुंबई-नाशिक दोन्ही बाजूची रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच अनेक लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसही गाड्याही खोळंबल्या आहेत.
या अपघातात अडकलेल्या प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्याचे काम हाती घेतले आहे. जखमींना घोटीजवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Friday, November 15, 2013, 08:13