मंगला एक्सप्रेस अपघात : जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल

Last Updated: Friday, November 15, 2013, 15:10

इगतपुरीजवळ घोटी इथं आज सकाळी साडेसहाच्या सुमारास रेल्वे अपघात झाला. या अपघातात ३ जण ठार झालेत २९ प्रवासी जखमी आहे. जखमींना घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर गंभीर जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मंगला एक्सप्रेस अपघात : अनेक गाड्या रद्द, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

Last Updated: Friday, November 15, 2013, 13:41

नाशिकजवळ घोटी येथे मंगला एक्स्प्रेस झालेल्या अपघातामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. तर अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्या मनमाडहून दौंड मार्गे मुंबईकडे वळविण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाकडून तीन ठार झाल्याचे सांगितले आहे.

मंगला एक्स्प्रेस अपघातात पाच ठार

Last Updated: Friday, November 15, 2013, 12:14

मुंबईकडे येणाऱ्या मंगला एक्स्प्रेस अपघातात पाच ठार झालेत. इगतपुरी येथे मंगला एक्स्प्रेसचे चार डबे रुऴावरुन घसरल्याने हा अपघात झाला.