Last Updated: Tuesday, October 1, 2013, 18:48
www.24taas.com, झी मीडिया, मालेगावमालेगावमध्ये एका मांत्रिकाने पैसे दुप्पट करून देण्याच्या नावाखाली महिलेवर बलात्कार केला. पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायदा व बलात्काराच्या आरोपाखाली अश्फाकला अटक केली आहे.
मालेगावमधील आयेशा भागात राहणा-या महिलेला अश्फाक नामक भोंदूबाबाने फसवलं. तिला पैसे दुप्पट करण्यासाठी भूताला प्रसन्न करुन देतो असं सांगितलं. पैसे दुप्पट होतील या आशेने ती महिला आपल्या मुलीसह मांत्रिकाला भेटण्यासाठी गेली. यावेळी डाव साधत मांत्रिकाने महिलेवर आणि तिच्या मुलीवरही बलात्कार केला.
अखेरीस रात्री उशीरा पिडीत मुलीने मालेगाव पोलिसांकडे अश्फाकविरोधात तक्रार केली. सध्या अश्फाकला अटक करण्यात आली आहे. मात्र या घटनेतून जादूटोणा विरोधी कायद्याचं महत्व अधोरेखित झालं आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, October 1, 2013, 16:56