Last Updated: Sunday, September 15, 2013, 23:51
www.24taas.com, झी मीडिया, बीडबीडमधील केज येथे चार जणांना डान्सरसोबत अश्लील चाळे करताना पोलिसांनी शनिवारी पहाटे रंगेहाथ पकडलं आहे. विशेष म्हणजे यातील एकजण राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष होता. चौघेही पंचायत समितीच्या मागे टाटा सुमो कारमध्ये अश्लील चाळे करताना पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष प्रकाश नानासाहेब भांडवलकर, महादेव सोपान कराड, बालाजी बळीराम गवळी अशी आरोपींची नावे आहेत. तिघे शुक्रवारी रात्री जीपने तालुक्यातील बरड फाट्यावरील कला केंद्रात गेले. तेथून सोबत एका डान्सरला आणले. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास त्यांनी जीप केजच्या पंचायत समितीमागे उभी केली. आंबटशौकीन तरुणांनी डान्सरसोबत जीपमध्येच अश्लील चाळे सुरू केले.
दरम्यान, गणपती बंदोबस्तासाठी पोलिसांच्या गस्तीवरील पथकाने चौघांना रंगेल चाळे करताना पकडले. पोलिस निरीक्षक नंदकुमार पाटील, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण, फौजदार बाळासाहेब रोकडे, जमादार राजेश पवार, शरद पवार, मुकुंद एकशिंगे, कपिल आडेकर यांनी ही कारवाई केली. शनिवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश जगदीश जोशी यांनी त्यांची जामिनावर सुटका केली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, September 15, 2013, 23:51