Last Updated: Monday, February 24, 2014, 23:49
www.24taas.com, झी मीडिया, नाशिकजळगाव जिल्ह्यातील पाचोरा मतदार संघाचे आमदार दिलीप वाघ हे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
आमदार दिलीप वाघ यांच्यावर बलात्कार प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
आमदार दिलीप वाघ यांच्यावर बलात्कार प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं.
आरोपपत्रात पोलिसांकडून वाघ यांना क्लिनचीट दिली असल्याचं लक्षात, आल्यानंतर पोलिसांना क्लिनचीट देण्याचे अधिकार नाहीत, म्हणून त्यांनी दिलीप वाघ यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
यामुळे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वाघ पुन्हा अडचणीत आले आहेत. आमदार दिलीप वाघ यांच्यावर एका मुलीने बलात्काराचा आरोप केला आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, February 24, 2014, 23:48