शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले पोटात का दुखतं - पवार, `farmers of money received in the stomach ache`

शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले पोटात का दुखतं - पवार

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक

कांदा उत्पादक शेतक-याला दोन पैसे मिळाले तर इतरांच्या पोटात का दुखतं, असा सवाल केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केलाय. बिसलेरी २० रुपयांना घेताना त्रास होत नाही का ? असे पवार यांनी म्हटले.

कांद्याचे भाव गेल्यानं दिल्लीमध्ये शीला दीक्षितांची खुर्ची गेली. आता आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल दिल्लीमध्ये कांद्याचे भाव निम्म्यावर कसे आणणार, असा सवालही त्यांनी केलीय. दिल्लीत केवळ अफवा पिकतात बाकी काही असंही पवारांनी म्हटलंय.त्याचबरोबर पवारांनी व्यापा-यांनाही खडे बोल सुनावलेत. पवार दोन दिवसांच्या नाशिक जिल्हा दौ-यावर आहेत. ते नांदगावमध्ये बोलत होते.

निर्यातशुल्क शून्य करू पण व्यापा-यांनी तारतम्य ठेवून व्यापार करावा, नफा मोजका ठेवून शेतक-यांना त्याचा फायदा होऊ द्यावा असा सल्ला पवारांनी व्यापा-यांना दिलाय. तसंच राज्यातील कनेक्शन तोड मोहीम बंद होणार असून त्याचे आज-उद्यामध्ये आदेश काढणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

शरद पवार नाशिक जिल्हा दौ-यात विविध विकासकामांच्या उद्धाटनाबरोबरच लोकसभेसाठी चाचपणी करण्याची शक्यता आहे. कांद्याचा भाव घसरल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संतप्त आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा दौरा हा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मराठा आरक्षण आणि कांदा प्रश्नी कुठलाही अनुचित आंदोलनाचा प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी ३०-४० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 24, 2013, 14:11


comments powered by Disqus