Last Updated: Thursday, February 21, 2013, 11:40
www.24taas.com, नाशिक दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या एका टोळीस मनमाड पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीनं अगदी ‘बॉलिवूड स्टाईल’ पाठलाग करून अखेर जेरबंद केलंय. टोळीतील एक जण फरार झालाय.
पकडण्यात आलेले सर्व आरोपी धुळे येथील सराईत गुन्हेगार असून विविध पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. मालेगावकडून दरोडेखोरांची एक टोळी रस्ता लूट आणि दरोडे टाकण्याच्या उद्देशानं मनमाडच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी शहरातील मालेगाव नाका परिसरात सापळा रचला होता. याची माहिती दरोडेखोरांना लागताच दरोडेखोरांनी गाडी नांदगावच्या दिशेने सुसाट वेगाने नेली. पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून मनमाड-नांदगाव रस्त्यावर जोधलवाडी शिवारात चोरट्यांना थोपवलं आणि अटक केली.
या सराईत दरोडेखोरांकडून पोलिसांनी एक मारुती ईको कार, चॉपर, गज आणि ४ मोबाईल जप्त केलेत.
First Published: Thursday, February 21, 2013, 08:20