भाव गडगडले तरीही कांदा महागच, Prices onion

भाव गडगडले तरीही कांदा महागच

भाव गडगडले तरीही कांदा महागच
www.24taas.com , झी मीडिया, नाशिक

दर वाढीचे नवनवीन विक्रम प्रस्थापित करणार्या् कांद्याचे भाव अचानक गडगडल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. ५ हजारावरून आता ३८०० रुपयांत कांदा पोहचलाय. त्यामुळे शेतकरी नाराज झालाय.

कांद्याचा भाव पडल्याने बाजार समितीतील लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समितीनं शेतक-यांच्या हितासाठी घेतलाय. जुने व्यापारी नवीन व्यापा-यांना बाजारात येऊ देत नाही आणि लिलावात सहभागी होऊ देत नाही. आवक कमी असल्यानं ह्या सर्व गोष्टींचा परिणाम कांद्याच्या भावावर होतोय. कांदाही याच कारणामुळे गडगडलाय.

मात्र, किरकोळ बाजारात कांद्याला किलोमागे ६० ते ७० रूपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे ग्राहकांत तीव्र नाराजी आहे. कांद्याचा फायदा दलालांना मिळत आहे. परंतु सरकार भाव वाढीवर नियंत्रण मिळवत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यसरकारने कांद्याचा लाभ उठवणाऱ्यांवर कारवाई करण्याची भाषा केली होती. मात्र, सरकारकडून काहीही उपाययोजना होताना दिसत नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, August 28, 2013, 09:08


comments powered by Disqus