Last Updated: Sunday, December 16, 2012, 20:47
www.24taas.com,नाशिकनाशिक जिल्हात स्वतःला पेटवून घेतलेल्या शाळकरी मुलीचा मृत्यू झालाय. बलात्काराचा प्रयत्न झाल्यानं तीनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. या मुलीवर तिच्या आत्तेभावानं बलात्काराचा प्रयत्न केला. बदनामीच्या भीतीनं या मुलीनं स्वताला जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. चांदवड तालुक्यातल्या शिंदे गावातली घटना. यात ही मुलगी ७०टक्के भाजली होती. तिच्यावर नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.
दरम्यान, स्वप्नील यशवंते याला अटक करण्यात आलीय. त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीचं या मुलीवर एकतर्फी प्रेम होतं. त्यानं तिला एकट्यात गाठून सांगण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र मुलगी त्याला दाद देत नव्हती. गुरुवारी दुपारी अचानक आरोपी स्वप्नील शिंदे हा गावात आला. घरी कोणी नसल्याची संधी साधून त्यानं या मुलीवर बलात्कारचा प्रयत्न केला.
First Published: Sunday, December 16, 2012, 12:30