सेक्सची मागणी करणाऱ्या तहसीलदाराला महिलांनी चोपले, sex demand for work by tehsildar in dhule

सेक्सची मागणी करणाऱ्या तहसीलदाराला महिलांनी चोपले

सेक्सची मागणी करणाऱ्या तहसीलदाराला महिलांनी चोपले
www.24taas.com, झी मीडिया, धुळे
धुळ्यात तहसीलदार ईश्वर राणे यांना शिवसेनेच्या माहिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलीय. ईश्वर राणे यांनी महिलांशी अश्लील वर्तवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय. स्टींग ऑपरेशन करून त्यांचा पर्दाफाश करण्यात आलाय.

तहसीलदारांकडे अनेक कामे प्रलंबित होती, ती कामे करण्याची मागणी करण्यात आली. त्यावेळी तहसीलदाराने शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप शिवसेनेच्या महिला आघाडीच्या सदस्या हेमा हेमाडे यांनी यावेळी केला. ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांकडे शरीर सुखाची मागणी केल्याचे अनेक प्रकार आमच्या कानावर आले. त्यामुळे याला रंगेहाथ पकडण्यासाठी हे स्टींग ऑपरेशन केल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणी पोलिसांनी तहसिलदारांना अटक केली असून शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तहसीलदार कार्यालयात ठिय्या आंदोलन केले आहे. तसेच स्टिंग ऑपरेशनचे फुटेज आता जिल्हाधिकारी तपासत असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांनी दिली.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 27, 2013, 18:25


comments powered by Disqus