Last Updated: Friday, March 22, 2013, 22:15
www.24taas.com, नाशिकनाशिकमधल्या वाय डी बिटको गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षकाविरोधात २९ विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेतल्या मुख्याध्यापिकेच्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. विनयभंग करणाऱ्या तात्याजी अहिरे या शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
अश्लील हावभाव करत अंगाला स्पर्श करतो अशी तक्रार सातवी आणि आठवीच्या विद्यार्थिनींनी तात्याजीच्या विरोधात मुख्याध्यापीकेकडे केली होती. डिसेंबर २०१२ ते फेब्रुवारी २०१३ या कालावधीत विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
विशेष म्हणजे शाळा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून तात्याजीची दुसऱ्या शाळेत बदली करण्यात आली होती. यासंदर्भात पालकांनी शाळा प्रशासनाची भेटही घेतली होती. त्यानंतर आज या शिक्षकावर कारवाई करण्यात आली आहे.
First Published: Friday, March 22, 2013, 22:15