पाण्यासाठी जावे लागले जेलमध्ये - Marathi News 24taas.com

पाण्यासाठी जावे लागले जेलमध्ये

झी २४ तास वेब टीम, नाशिक
 
नाशिक जिल्ह्यातील येवला परिसरात पाण्यासाठी आंदोलन करणा-या 250 आंदोलकांना अटक करून नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आलंय.
 
औरंगाबाद नाशिक रस्त्यावरील गवंडगावात पालखेडच्या डाव्या कालव्यातून शेतीला पाणी मिळावं य़ासाठी नागरिकांनी रास्ता रोको केला होता, यावेळी पोलिसांनी शेतक-यांना बदडून काढलं. पोलिसांच्या लाठीमारात अनेक शेतकरी जखमी झालेयेत, गेल्या दोन दिवसांपासून ग्रामीण भागात सुरु असलेल्या आंदोलनामुळे पोलिस त्रस्त झालेयेत.
 
बुधवारी सिन्नर घोटी रस्त्यावर अपघात झाल्यामुळे जमावाने पोलिसांना मारहाण केली होती. त्यामुळे चिडलेल्या पोलिसांनी शेतक-यांना मारहाण केल्याचं बोलंल जातय.. शेतक-यांना अटक केल्यानंतरही आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शेतक-यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन सुरु केलं होतं.

First Published: Friday, December 2, 2011, 06:34


comments powered by Disqus