यांत्रिक पद्धतीने पिकांची लागवड - Marathi News 24taas.com

यांत्रिक पद्धतीने पिकांची लागवड

झी २४ तास वेब टीम
 
विदेशात हजारो हेक्टर क्षेत्रावर भाजीपाल्याच्या रोपांची लागवड  यांत्रिक पद्धतीने करतात. विदेशातील आधुनिक  भाजीपाला लागवडीचं यंत्रामुळे मोठ्या क्षेत्रावर सहज लागवड होत असल्याने यांत्रिक शेतीला महत्व प्राप्त होत चाललंय. परदेशात अशा पद्धतीने भाजीपाला पिकांची लागवड केली जाते.
 
कांदा, कोबी, फुलकोबी, मिरची अशा अनेक भाजीपाला पिकांची लागवड मोठ्या आऱामात या यंत्रामार्फत केली जाते. ट्रेमध्ये रोप सेट करुन ठेवली जातात आणि यांत्रिक पद्धतीने चार ओळीत ठरावीक अंतरावर या रोपांची लागवड केली जातं. लागवड करतांना या यंत्रामार्फत एक निश्चित वेग ठेवला जातो. यामुळे रोपांची लागवड गादीवाफ्यावर खोलवर होते. या यंत्रामुळे शेकडो हेक्टरवरील लागवड सहज होते.
 
विशेष म्हणजे या ट्रान्सप्लान्टरमुळे पिकांची वेळेत लागवड होते. अत्यंत कमी प्रमाणात मजूरांची उपलब्धता लागत असल्याने परदेशात अशा यांत्रिक पद्धतीने हंगामी पिकांच्या रोपांची लागवड केली जाते. आपल्या राज्यातील शेतकऱ्याला शेतीमालाला भाव मिळत नसल्याने अशा प्रकारच्या यंत्र परवडणारी नसली, तरी मजूर टंचाईची समस्या पाहता शेतकरी गटांना किंवा गावपातळीवर अशा यंत्रांची गरज उद्या भासणारच आहे.

First Published: Friday, December 2, 2011, 14:36


comments powered by Disqus