एसटीची बाइकला धडक, तिघे ठार - Marathi News 24taas.com

एसटीची बाइकला धडक, तिघे ठार


झी २४ तास वेब टीम, नाशिक
 
कळवण-वणी मार्गावर एसटी बस आणि मोटरसायकल यांच्यात मंगळवारी रात्री झालेल्या अपघातात बालकासह एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला.
 
एसटी बस ही नांदूरीकडे; तर मोटरसायकल नांदूरीहून वणीकडे जात होती. जिभाऊ कांतीलाल गायकवाड (वय ३८), त्यांची पत्नी कल्पना जिभाऊ गायकवाड (३५) आणि मुलगी सरला (१) अशी मृतांची नावे असून, ते कळवण तालुक्यातील नरुळ येथील रहिवासी होते.

First Published: Sunday, October 2, 2011, 14:26


comments powered by Disqus