नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीची सरशी - Marathi News 24taas.com

नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीची सरशी

झी २४ तास वेब टीम, मुंबई
नाशिक जिल्ह्यातील येवला आणि सटाणामध्ये राष्ट्रवादीची विजयी घोडदौड सुरू असून येवल्यात १४ आणि सटाणामध्ये ११ जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे वर्चस्व असलेल्या नाशिक जिल्ह्यात बऱ्याच नगरपालिका राखण्यात राष्ट्रवादीला यश मिळाले आहे.
राष्ट्रवादीला पाचोऱ्यात दणका!
पाचोरामध्ये खान्देश विकास आघाडीने मुसंडी मारली आहे. खान्देश विकास आघाडीने १९ जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादीला दणका दिला आहे. राष्ट्रवादीला या नगरपालिकेत फक्त ६ जागा मिळविण्यात यश मिळाले आहे.  आमदार दिलीप वाघांचे बलात्कार प्रकरण राष्ट्रवादीला भोवले आहे.

नगरपालिकेत बहुमत मिळवलेले पक्ष


तळेगाव दाभाडे - राष्ट्रवादी पाठिंबा आघाडी.
म्हसवड - काँग्रेस
 
कुर्डुवाडी - शिवशक्ती-भीमशक्ती
पनवेल - काँग्रेस
अर्धपूर - काँग्रेस
इंदापूर - काँग्रेस
रत्नागिरी - शिवसेना
सावंतवाडी- राष्ट्रवादी
वेंगुर्ला - राष्ट्रवादी
रोहा - राष्ट्रवादी
तिरोडा - राष्ट्रवादी
सांगोला - शेकाप
पाचोरा- खान्देश विकास आघाडी
मुरूड- राष्ट्रवादी
माथेरान- माथेरान विकास आघाडी
पेण काँग्रेस
खेड (रत्नागिरी)- मनसे
येवला, सटाणा - राष्ट्रवादी
पंढरपूर - भारत भालके गट
परळी वैजनाथ- त्रिशंकू
बारामती - राष्ट्रवादी

First Published: Monday, December 12, 2011, 09:07


comments powered by Disqus