Last Updated: Thursday, July 5, 2012, 16:00
www.24taas.com, धुळे 
धुळे शहरातील सम्राट नगर परिसरात सशत्र दरोडा टाकून दरोडखोरांनी चार लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. धुळे शहरातील सम्राट नगर भागातील मधुमालती अपार्टमेन्ट मध्ये राहणाऱ्या बोरुडे यांच्या घरी काल रात्रीच्या सुमारास चार दरेडोखोरांनी सशत्र दरोडा टाकून लुटमार केली.
डॉ. बोरुडे घरात झोपलेले असताना दारेडोखोरांनी पाणी पिण्याच्या बहाण्याने डॉ. बोरुडे यांचे घराच दार ठोठावले. बोरुडे यांनी दरवाजा उघडताच दरेडोखोरांनी घरात प्रवेश करत त्यांना मारहाण सुरु केली.
मारहाणीत डॉ. बोरुडे जखमी झाले आहेत. घरातील सर्वांना बांधून दारेडोखोरांनी घरातील इलेक्ट्रोनिक्स वस्तू तसेच सोन्या चांदीच्या दागिन्यासह सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला.
First Published: Thursday, July 5, 2012, 16:00