पाणी पिण्यासाठी आले, चार लाख लुटून नेले...

Last Updated: Thursday, July 5, 2012, 16:00

धुळे शहरातील सम्राट नगर परिसरात सशत्र दरोडा टाकून दरोडखोरांनी चार लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. धुळे शहरातील सम्राट नगर भागातील मधुमालती अपार्टमेन्ट मध्ये राहणाऱ्या बोरुडे यांच्या घरी काल रात्रीच्या सुमारास चार दरेडोखोरांनी सशत्र दरोडा टाकून लुटमार केली.