चला कोथींबीर घेऊया २०० रूपयाला... - Marathi News 24taas.com

चला कोथींबीर घेऊया २०० रूपयाला...

www.24taas.com,  नाशिक
 
पावसाने मारलेली दडी आणि त्यामुळे भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. पण भाज्यांचे भाव अक्षरश: गगनाला भिडले आहेत. आज तर भाज्यांच्या दर अक्षरश: कहरच केला. कोथींबीरची एका जुडीसाठी आज तुम्हांला तब्बल २०० रूपये मोजावे लागणार आहेत. म्हणजे शेकडा १६००० इतका भाग कोथींबीरला मिळाला आहे.
 
नाशिकमध्ये कोथिंबिरीच्या दराने उच्चांकी पातळी गाठली. पंचवटीतील मार्केट यार्डातील लिलावात कोथिंबीरीला शेकडा १६ हजार रुपये भाव मिळाल्याने ग्राहकांना एका जुडीसाठी तब्बल २०० रुपये मोजावे लागले. सर्वसामान्यांना कोथिंबीरीची चव महाग झाली असली तरी, शेतकरी बांधवांनी मात्र गुलाल उधळत या उच्चांकाचे स्वागत केले.
 
यंदा कोथिंबीरीची आवक कमी असल्याने जास्त भाव मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. लिलावानंतर बाजारात उपस्थित शेतकऱ्यांनी गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला. मात्र आधीच महागाईची झळ सोसणाऱ्या सर्वसामान्यांनी या भाववाढीविषयी नाराजी व्यक्त केली. मुख्य बाजारात एवढा भाव असल्याने किरकोळ विक्रीत कोथिंबीरीच्या एका जुडीचा भाव दोनशे रुपयांपर्यंत जाण्याची भीती व्यक्त होते आहे.
 
 
 
 

First Published: Wednesday, August 1, 2012, 13:42


comments powered by Disqus