Last Updated: Monday, August 6, 2012, 16:11
www.24taas.com, जळगाव 
रॅगिंग हा प्रकार विद्यार्थ्यांवर केला जातो. अशी आपली समजूत आहे. मात्र आता शिक्षकांवरही रॅगिग सुरू झाली आहे. आणि या रॅगिंगमुळे एका शिक्षकाला आपला जीव गमवावा लागला आहे.
शाळेतील कर्मचाऱ्यांच्या त्रासामुळं एका शिक्षकाचा हृदयविकारानं मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात ही घटना घडली आहे. फाफोरे इथल्या पंडीत नेहरु माध्यमिक विद्यालयात श्याम गोकूळ या शिक्षकाचा गेल्या सहा वर्षांपासून छळ होत होता.
याबाबत मुख्याध्यापक आणि पोलिसांकडे गोकूळ यांनी तक्रारही केली होती. या प्रकाराबाबत गोकूळ यांनी आपल्या डायरीत नोंदी करुन ठेवल्या होत्या. दरम्यान, पोलिसांनी शिक्षक बाळू पाटील, गुलाब मोरे, लिपीक मनोहर पाटील, शिपाई ईश्वर पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
First Published: Monday, August 6, 2012, 16:11