थंडीची लाट, फळांची वाट! - Marathi News 24taas.com

थंडीची लाट, फळांची वाट!

 www.24taas.com, रत्नागिरी
 
आंबाप्रेमींसाठी एक वाईट बातमी आहे. सध्या राज्यभर पसरलेल्या थंडीच्या लाटेमुळं आंब्याचं उत्पादन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
 
थंडीमुळं आंब्याला  अद्याप मोहोरच आलेला नाही. कोकणातलं मिनी महाबळेश्वर समजल्या जाणाऱ्या दापोलीमध्ये पारा साडेसात अंशांपर्यंत खाली घसरला आहे. फलधारणेसाठी ही थंडी पोषक असली, तर सलग मुक्कामाला आलेली थंडी आंब्यासाठी घातक ठरणारी आहे. जोपर्यंत थंडी ओसरत नाही, तोपर्यंत आंब्याच्या फलधारणेची पुढची नैसर्गिक प्रक्रिया सुरू होत नाही. त्यामुळं यंदाच्या गुलाबी थंडीमुळं कोकणातले पर्यटक सुखावले असले, तरी आंबा बागायतदारांना चांगलीच  हुडहुडी भरली आहे.
 
नाशिकमध्येही थंडीनं कहर केल्यानं द्राक्ष बागायतदार अडचणीत आला आहे. निफाड तालुक्यात पारा २.८ अंशांवर गेल्यानं द्राक्षं गोठली आहेत. चांदवड, इगतपुरी, लासलगाव, येवला या भागातही शीतलहर आहे. त्यामुळे तिथल्या द्राक्षांवरही थंडीचा परिणाम झाला आहे.
 
 

First Published: Wednesday, January 11, 2012, 17:11


comments powered by Disqus