Last Updated: Saturday, February 11, 2012, 16:40
www.24taas.com, नाशिक नाशिकमधल्या सातपूर परीसरातील शिवाजीनगर भागात राष्ट्रवादीच्या रॅलीवर दगडफेक करण्यात आली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला आहे.
प्रभाग क्रं.१७ मध्ये आघाडी नाही. दोन्ही पक्षाने स्वतंत्र उमेदवार उभे केलेत. राष्ट्रवादीचे सदाशिव माळी रिंगणात आहेत. तर काँग्रेसकडून दिनकर पाटील निवडणूक लढवतायेत. दोन्ही उमेदवार विद्यमान नगरसेवक आहेत. दिनकर पाटील आणि त्यांच्या गुंड समर्थकांनी रॅलीत गोंधळ घातला. त्यांना अटक करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
पाटील यांच्या प्रचार कार्यालयासमोरुन रॅली जात असताना हा प्रकार घडला. आघाडी नसल्यानं दोन्ही पक्षांनी प्रभाग क्र. १७ ची निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. दगडफेक झाल्यानं काही काळ परीसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात ठेवला होता. घटनेनंतर राष्ट्रवादीचे खासदार समीर भूजबळ यांनी उमेदवार आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली.
First Published: Saturday, February 11, 2012, 16:40