Last Updated: Tuesday, March 20, 2012, 08:35
www.24taas.com, जळगाव 
जळगावमधल्या २९ कोटी ५९ लाखांच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे आमदार सुरेश जैन यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश अमळनेर न्यायालयाने दिले आहेत. १० मार्चला अटक झाल्यानंतर जैन यांना ११ मार्चला जळगाव न्यायालयाने ९ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली होती.
त्याची मुदत सोमवारी संपणार होती. त्यामुळे घोटाळ्याच्या तपासासाठी २ दिवसांची पोलीस कोठडी सरकारी पक्षानं मागितली होती. मात्र ती फेटाळून लावत न्यायलयान त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
दरम्यान रात्री उशीरा जैन यांचं ब्लड प्रेशर वाढल्यानं त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याच उपचार करणाऱ्या डॉक्टरानी सांगितलं आहे. मात्र सुरेश जैन यांना रूग्णालयातून परत कधी सोडणार हे ़डॉक्टरांनी स्पष्ट केलेले नाही.
First Published: Tuesday, March 20, 2012, 08:35