Last Updated: Wednesday, March 21, 2012, 07:56
www.24taas.com, जळगाव 
शिवसेनेचे आमदार सुरेश जैन घरकुल घोटाळ्या प्रकरणी अटकेत आहेत. मात्र सोमवारी रात्री त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास सुरु झाल्यानं त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मंगळवारी डॉक्टरांनी त्यांच्यावर एन्जीओग्राफी केली आहे. त्यांच्या तीन नस ८० ते ९० टक्के ब्लॉक झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांच्यावर बायपास किंवा एन्जीओप्लास्टी सर्जरी केली जाण्याची शक्यता आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याच उपचार करणाऱ्या डॉक्टरानी सांगितलं आहे.
मात्र सुरेश जैन यांना रूग्णालयातून परत कधी सोडणार हे ़डॉक्टरांनी स्पष्ट केलेले नाही. त्यांना एक आठवडा विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. दरम्यान जैन यांना न्यायालयाने ३० मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
First Published: Wednesday, March 21, 2012, 07:56