Last Updated: Wednesday, March 28, 2012, 08:25
www.24taas.com, अहमदनगर मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेल्या डेडलाईन संपण्यासाठी काही तासच शिल्लक असताना सरकारनं शिर्डीच्या साईसंस्थानच्या विश्वस्तांची यादी जाहीर केली आहे. नवी विश्वस्तांची यादी जाहीर करताना संस्थानचे अध्यक्ष जयंत ससाणे यांना अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे.
नव्या यादीत अकरा नव्या चेह-यांना विश्वस्त मंडळात संधी देण्यात आली आली. विश्वस्त मंडळात सात काँग्रेस तर सात राष्ट्रवादीचे सदस्य आणि शिर्डी नगर पंचायतीचा एक अध्यक्ष अशा पंधरा जणांचा समावेश आहे.यावेळी राष्ट्रवादीचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष घनशाम शेलार यांना संस्थानाचे उपाध्यक्षपद देण्यात आले आहे.जयंत ससाणे, राधाकृष्ण विखे पाटील आणि शैलेश कुटे हे तिघंजण जुन्या विश्वस्त मंडळातही होते.
जुन्या विश्वस्त मंडळातील सदस्य आणि पदाधिका-यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना पुन्हा विश्वस्त मंडळात घेऊ नका अशा आशयाची एक याचिका हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात प्रलंबित आहे. नवीन विश्वस्तमंडळ नेमताना सरकारनं या याचिकेचा विचार केलेला नाही हे विशेष.
संबंधित आणखी बातम्या शिर्डी संस्थान समितीला दणका साईबाबा संस्थान विश्वस्तांविरूध्द गुन्हा शिर्डी साईबाबा संस्थानच्या उत्पन्नात २१% वाढ साईमंदिराच्या पार्किंग लॉटमध्ये चोरी शिर्डी: व्हीआयपी दर्शनाला ‘नो एन्ट्री’ शिर्डी साईबाबा संस्थानची संपत्तीत वाढ ‘साईंचा महिमा’… अंधांनाही वाचता येणार शिर्डी साईबाबांच्या दर्शन रांगेत भक्ताचा मृत्यू
First Published: Wednesday, March 28, 2012, 08:25