साई संस्थानाच्या विश्वस्तांची उधळपट्टी

Last Updated: Thursday, April 12, 2012, 14:45

शिर्डीतील साई संस्थानच्या तिजोरीचा अध्यक्ष-विश्वस्त आणि कार्यकारी अधिकाऱ्यांकडूनच गैरवापर होत असल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. संस्थानच्या विश्वस्तांनी मोबाईल बिलावर हजारो रुपयांची उधळपट्टी केल्याचं उघडकीस आलंय.

शिर्डी संस्थानाला हायकोर्टाचा पुन्हा दणका

Last Updated: Wednesday, April 4, 2012, 13:56

शिर्डी संस्थानाला हायकोर्टानं पुन्हा दणका दिलाय. तत्कालीन विश्वस्त मंडळ आणि आजी माजी नगराध्यक्षांना घोटाळ्यासंदर्भात स्पष्टीकऱण देण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत. स्पष्टीकरण देण्यासाठी हायकोर्टानं तीन आठवड्यांची मुदत दिली आहे.

शिर्डीच्या नव्या ट्रस्टला स्थगिती

Last Updated: Friday, March 30, 2012, 16:21

शिर्डी संस्थानच्या नव्या विश्वस्त मंडळाच्या निवडीला औरंगाबाद खंडपीठानं स्थगिती दिलीय. औरंगाबाद खंडपीठानं विश्वस्त मंडळाच्या नेमणुकीसंदर्भात नियमावली तयार करण्याचे आदेश 2010 मध्ये दिले होते.

साईंच्या दरबारात राजकारणीच संस्थानिक

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 21:45

हायकोर्टाच्या बडग्यानंतर शिर्डीच्या साई संस्थानचं नवं विश्वस्त मंडळ राज्य सरकारनं जाहीर केलं. परंतु नव्या चेहऱ्यांच्या विश्वस्त मंडळात जुनाच राजकीय फॉर्म्यूला आणत राज्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आपली राजकीय सोयच पाहिली आहे.

शिर्डी साईसंस्थान विश्वस्तांची नवी यादी

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 08:25

मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेल्या डेडलाईन संपण्यासाठी काही तासच शिल्लक असताना सरकारनं शिर्डीच्या साईसंस्थानच्या विश्वस्तांची यादी जाहीर केली आहे. नवी विश्वस्तांची यादी जाहीर करताना संस्थानचे अध्यक्ष जयंत ससाणे यांना अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे.

शिर्डी संस्थान समितीला दणका

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 09:04

शिर्डी संस्थानची समिती बरखास्त करुन येत्या १५ दिवसांत नवीन समिती स्थापन करा, असा आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं सरकारला दिलाय. १५ दिवसांत राज्य सरकारनं ही समिती नेमली नाही, तर साई संस्थानाची सूत्र ३ सदस्यीय समितीकडे जाणार आहेत. दररोज एक कोटी रुपयांचं उत्पन्न असलेल्या शिर्डी संस्थानच्या विश्वस्तांना हा दणका मानण्यात येत आहे.