पराभूत विजयी घोषित, उस्मानाबाद झेडपी त्रिशंकू - Marathi News 24taas.com

पराभूत विजयी घोषित, उस्मानाबाद झेडपी त्रिशंकू

www.24taas.com, उस्मानाबाद
 
 
उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या मोहा गटाच्या मतमोजणीतील गोंधळाप्रकरणी जिल्हा न्यायालयानं  शिवसेनेच्या पराभूत उमेदवार सविता कोरे यांना विजयी घोषित केलं आहे.
 
 
मतमोजणी यंत्राची अदलाबदल झाल्याच्या प्रकरणावरुन शिवसेनेच्या पराभूत उमेदवार सविता कोरे यांनी उस्मानाबाद जिल्हा न्य़ायालयात याचिका दाखल केली होती. त्याचा निकाल देताना न्यायालयानं शिवसेनेच्या पराभूत उमेदवार सविता कोरे यांना 48 मतांनी विजयी घोषित केले.  याआधी मोहा गटातून राष्ट्रावादीच्या नंदुबाई माने विजयी झाल्याचं निवडणूक आयोगानं घोषित केलं होतं. मात्र हा निर्णय न्यायालयानं रद्द केला आहे.
 
 
या निर्णयामुळे उस्मानाबाद जिल्हा परिषदेत त्रिशंकु अवस्था निर्माण झाली आहे. याच प्रकरणामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकींना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठानं 30 मार्चपर्यंत स्थगिती दिली होती.मात्र या निकालामुळे उस्मानाबाद झेडपीच्या अध्यक्ष आणि  उपाध्यक्ष पदासाठीच्या निवडणूकीचा मार्ग आता मोकळा झालाय.

First Published: Saturday, March 31, 2012, 15:56


comments powered by Disqus