शिर्डी संस्थानाला हायकोर्टाचा पुन्हा दणका - Marathi News 24taas.com

शिर्डी संस्थानाला हायकोर्टाचा पुन्हा दणका


www.24taas.com, शिर्डी
 
शिर्डी संस्थानाला हायकोर्टानं पुन्हा दणका दिलाय. तत्कालीन विश्वस्त मंडळ आणि आजी माजी नगराध्यक्षांना घोटाळ्यासंदर्भात स्पष्टीकऱण देण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत. स्पष्टीकरण देण्यासाठी हायकोर्टानं तीन आठवड्यांची मुदत दिली आहे.
 

शिर्डी संस्थानच्या नव्या विश्वस्त मंडळाच्या निवडीला औरंगाबाद खंडपीठानं स्थगिती दिली होती. औरंगाबाद खंडपीठानं विश्वस्त मंडळाच्या नेमणुकीसंदर्भात नियमावली तयार करण्याचे आदेश २०१० मध्ये दिले होते.
 
प्रत्यक्षात विश्वस्त मंडळात १५ सदस्यांची नेमणूक करतांना मात्र कोर्टाच्या निर्णयानुसार अंमलबजावणी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे न्यायमूर्तींनी विश्वस्त मंडळाच्या निवडीला स्थगिती दिली. पुढील निर्णय होईपर्यंत जिल्हा न्यायाधिश, जिल्हाधिकारी आणि शिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारभार पाहावा, असे आदेश कोर्टानं दिले होते.

First Published: Wednesday, April 4, 2012, 13:56


comments powered by Disqus