Last Updated: Wednesday, April 25, 2012, 15:55
www.24taas.com, धुळे राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ आहे.. मात्र मुबलक पाणी असतानाही काही ठिकाणी टंचाईसदृश परिस्थिती असेल तर.. उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात ही परिस्थिती आहे. शासनाच्या उदासीनतेमुळे तीन वर्षांपासून हे पाणी उन्हाळ्याच्या शेवटी गुजरातच्या शेतकऱ्यांना मिळत आहे.
शिंदखेडा तालुक्यातील तापी नदीवर बांधलेला हा भला मोठा बंधारा.. याची सिंचनक्षमता मोठी आहे. दोनशे नव्वद कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या बॅरेजमध्ये 2.98 अब्ज घनफूट पाणीसाठा होऊ शकतो...याची सिंचन क्षमता आहे 7 हजार 560 हेक्टर.. मात्र सध्या यातल्या पाण्याचा सिंचनासाठी वापर होतोय तो फक्त 452 हेक्टर जमिनीसाठी... शिरपूर तालुक्यातील 11 गावं आणि सिंदखेडा तालुक्यातील 20 गावं या पाण्यामुळे सुजलाम सुफलाम होऊ शकतात. मात्र सिंचनासाठी लागणाऱ्या लिफ्ट एरीगेशनची सोय नसल्यामुळे हा सर्व पाणीसाठा शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाही.
तापी नदीवर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात आणखी एक बॅरेज बांधण्यात आलंय.. सारंगखेडा बॅरेज.. सव्वा तीन अब्ज घनफूट पाणीसाठा यात होऊ शकतो... याची सिंचनक्षमता ११ हजार ५१९ हेक्टर.. मात्र याचाही वापर होतोय फक्त १२४५ हेक्टरसाठी.. म्हणजे यापासूनही तीस गावं हिरवी होण्यापासून वंचित राहिली आहेत. विशेष म्हणजे शासनाच्या उदासीनतेमुळे तीन वर्षांपासून हे पाणी उन्हाळ्याच्या शेवटी गुजरातच्या शेतकऱ्यांना मिळत आहे.
व्हिडिओ पाहा..
First Published: Wednesday, April 25, 2012, 15:55