Last Updated: Saturday, November 26, 2011, 09:10
झी २४ तास वेब टीम, जळगाव "कापसाला प्रतिक्विंटल सहा हजार रुपये भाव द्या, अन्यथा नागपुरातलं हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही", असा इशारा भाजपने दिलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी कापूसप्रश्नी सरकारच्या वेळकाढूपणावर जोरदार टीकास्त्र सोडलंय.
मुनगंटीवार आणि आमदार देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा सरकारी रुग्णालयात जाऊन आमदार गिरीश महाजन यांची भेट घेतली. महाजन यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस आहे. महाजनांची प्रकृती खालावल्याने काल त्यांना जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. उपोषण सोडण्याबाबत मुनगंटीवारांनी त्यांच्याशी चर्चा केल्याचं सांगण्यात येतंय. मात्र, सरकारने कापसाला योग्य हमीभाव दिला नाही, तर नागपुरात लाल दिव्याच्या गाड्या फिरकू देणार नाही, असा इशारा मुनगंटीवार यांनी दिलाय.
First Published: Saturday, November 26, 2011, 09:10