Last Updated: Thursday, May 10, 2012, 17:23
www.24taas.com, शिर्डी 
शिर्डीच्या साई मंदिराच्या प्रवेशद्वारावर दाऊ पिऊन दोन पोलिसांनी धिंगाणा घातला. नाशिक ग्रामीणचे हे पोलीस होते. व्हिआयपी गेटमधून प्रवेश न मिळाल्यानं त्यांनी हा गोंधळ घातला. शिर्डी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिर्डी साई मंदिरात नेहमीच गर्दी असते. त्यामुळे गर्दीच्या वेळेत व्हिआयपी गेटमधून फक्त व्हिआयपी व्यक्तींनाच आत प्रवेश दिला जातो. मात्र अनेक वेळेस पोलीस आपल्या खाकी वर्दीचा वापर करून आत जात असतात.
पण आज दोन पोलिसांनी अक्षरश: कहरच केला. दारू पिऊन साई मंदिरातच धिंगाणा घातला. त्यामुळे त्यांना पोलिसांनी अटक केली. आणि गुन्हाही दाखल केलेला आहे.
First Published: Thursday, May 10, 2012, 17:23