नाशिकजवळ अपघात ३ ठार, three killed in road mishap near nashik

नाशिकजवळ अपघात ३ ठार

नाशिकजवळ अपघात ३ ठार
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक

वणी महामार्गावर पहाटे झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले आहेत. क्वालिस गाडीला ट्रकला दिलेल्या धडकेत तीन जण ठार तर तीन जण जखमी झाले आहेत.

वणी महामार्गावरील उणंदानगर गावाजवळ हा अपघात घडला. अपघातातील मृतांमध्ये आरिफ गुलशन खान पठाण, पत्नी रुबीना पठाण, मुलगा सोनू ऊर्फ आसिफ पठाण यांचा समावेश आहे.

डॉ. सादिक शेख, गुड्डी ऊर्फ सिमरन आरिफ पठाण, यांच्यासह क्वालिसचा चालक अपघातात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, January 2, 2014, 17:48


comments powered by Disqus