Last Updated: Tuesday, February 26, 2013, 00:17
www/24taas.com, नाशिकमहिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असतानाचा मामाभाचीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नाशिकमध्ये घडलीय. मानलेल्या अल्पवयीन भाचीला रेडलाईट एरियात आणून तिला वाईट मार्गाला लावणाऱ्या विजय दिवेला देहविक्री करणाऱ्या महिलांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्यानं एक आयुष्य उध्वस्त होताना वाचलंय.
नाशिकमधला रेड लाईट एरिया...... या भागात अनेकांची आयुष्य चुकीच्या मार्गाला लागतात. अशीच एक उमलती कळी इथे कुस्करली जाणार होती...... दिंडोरी तालुक्यात राहणारा विजय दिवे त्याच्या मानलेल्या भाचीला घेऊन इथे आला. तिला नवे कपडे आणि नव्या चपलांचं आमिष दाखवलं आणि तिला या भागामध्ये त्यानं सोडून दिलं. या भागात देहविक्रय करणा-या महिलांना एक लहान मुलगी शाळेच्या युनिफॉर्ममध्ये फिरताना दिसली आणि त्या महिलांनी थेट दिशा बहुउद्देशीय संस्थेशी संपर्क साधला.
दिशा संस्थेच्या प्रयत्नांना यश आलं आणि चिमुरडीची सुखरुप सुटका झाली. विजय दिवेलाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. याआधीही रेड लाईट एरियात आठ ते दहा अल्पवयीन मुलींची सुटका देह विक्री करणा-या महिलांनी केली आहे. एका चिमुरडीचं आयुष्य उध्वस्त होता होता वाचलंय. आणि ते फक्त देहविक्रय करणा-या महिलांच्या चांगुलपणा आणि धाडाडीमुळे.....
First Published: Tuesday, February 26, 2013, 00:17