वॉर्डबॉयने मारली वृद्ध महिलेच्या कानाखाली!, Wardboy slaps aged lady patient in ICU

वॉर्डबॉयने मारली वृद्ध महिलेच्या कानाखाली!

वॉर्डबॉयने मारली वृद्ध महिलेच्या कानाखाली!
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक

नाशिकच्या संदर्भ सेवा रुग्णालयात आयसीयुमधल्या एका वयोवृद्ध महिला रुग्णाला वॉर्डबॉयनं थोबाडीत मारलीय.

मूळच्या मालेगावच्या अससेल्या जिजाबाई सोमवंशी या ६२ वर्षांच्या रुग्ण संदर्भ सेवा रुग्णालयात उपचार घेतायत. उपचारांदरम्यान चिडचिड करत असलेल्या या आजींचा धक्का वॉर्डबॉय संदीप पवारला लागला. त्याचा राग येवून त्याने जोरात आजीबाईंच्या तोंडात मारली. हा प्रकार दाबण्याचा रात्री प्रयत्न करण्यात आला.

सकाळी मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धडक मारल्यानंतर कंत्राटी कामगार असणा-या या वॉर्डबॉयला कामावरून काढून टाकण्यात आलंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, October 7, 2013, 23:13


comments powered by Disqus