वारकऱ्यांनी केला भालचंद्र नेमाडेंचा निषेध Warkari protest Bhalchandra Nemade

वारकऱ्यांनी केला भालचंद्र नेमाडेंचा निषेध

वारकऱ्यांनी केला भालचंद्र नेमाडेंचा निषेध
www.24taas.com,नाशिक

‘हिंदूः जगण्याची समृद्ध अडचण’ या पुस्तकाचे लेखक भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात वारकरी महामंडळाच्या वतीन टाळमृदुंगाच्या गजरात निषेध आंदोलन करण्यात आलं.

नुकताच कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वातीन ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचा जनस्थान पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला होता. या सत्काराला उत्तर देताना भालचंद्र नेमाडे यांनी आक्षेपार्ह भाषण केल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालय समोर नेमाडेंचा अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला.


नेमाडे यांनी राम-सीता, पांडव, द्रौपदी यांच्याबाबत केलेल्या विधानाची माफी मागावी अन्यथा पोलिसांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वारकरी महामंडळाकडून करण्यात आली आहे.

First Published: Monday, March 4, 2013, 22:47


comments powered by Disqus