मुलींना जीन्स-टी शर्ट वापरण्यास बंदी; वारकऱ्यांचा फतवा

Last Updated: Saturday, April 26, 2014, 17:01

वारकऱ्यांना आता आपण `खरा वारकरी` असल्याचं आता सिद्ध करावं लागणार आहे. कारण, वारकऱ्यांच्या संघटनेनं वारकऱ्यांनी आणि त्यांच्या मुला-मुलींनी कसं राहावं, याबद्दलेच काही फतवेच जाहीर केलेत.

कार्तिकी एकादशी : पंढरपुरात उत्साह, विरोधानंतर अजित पवारांचा दौरा रद्द

Last Updated: Wednesday, November 13, 2013, 08:22

कार्तिकी एकादशी. "अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माय तया पंढरपुरा भेटीन माहेरा आपुलिया` अशी आस उराशी बाळगून कार्तिकी यात्रेच्या आनंद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सुमारे तीन लाख वारकरी पंढरपुरात दाखल झालेत. दरम्यान, वारकऱ्यांचा विरोधानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही कारणाने आपला दौरा रद्द केला.

`अजितदादांना विठूरायाची पूजा करू देणार नाही`

Last Updated: Tuesday, November 12, 2013, 15:51

कोट्यवधी वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठलाची कार्तिकी एकादशीला शासकीय महापूजा करू न देण्याचा इशारा वारकरी संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलाय.

देहूनगरीत वारकरी मेळा, तुकोबांच्या नामाचा गजर

Last Updated: Saturday, June 29, 2013, 15:40

जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान झालं. मुख्य मंदिरातून दुपारी २ वाजता तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान झालं. त्यानंतर तुकोबारायांची पालखी इनामदारवाड्यात पोहचेल आणि इथंच पालखीचा मुक्काम असेल.

निवृत्तीनाथांच्या वारीला प्रथमच शासकीय सलामी

Last Updated: Sunday, June 23, 2013, 22:28

पंढरीच्या वारीप्रमाणे निवृत्तीनाथांच्या वारीला प्रथमच शासकीय सलामी मिळाली आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाने पालकमत्र्यांच्या उपस्थितीत यावर्षापासून या वारीत सहभागी होणाऱ्या विणेकऱ्यांचा यथोचित सन्मान केला आहे.

वारकऱ्यांनी केला भालचंद्र नेमाडेंचा निषेध

Last Updated: Monday, March 4, 2013, 22:47

‘हिंदूः जगण्याची समृद्ध अडचण’ या पुस्तकाचे लेखक भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात वारकरी महामंडळाच्या वतीन टाळमृदुंगाच्या गजरात निषेध आंदोलन करण्यात आलं.

कारच्या धडकेत पाच वारकरी ठार, नऊ जखमी

Last Updated: Saturday, February 16, 2013, 08:28

सोलापूर - हैदराबाद मार्गावर शनिवारी पहाटे एक भीषण अपघात झालाय. एका कारच्या धडकेत पाच वारकरी जागीच ठार तर नऊ जण जखमी झालेत.

फड दांम्पत्य ठरले ‘मानाचे वारकरी’

Last Updated: Saturday, June 30, 2012, 10:37

गेल्या अनेक वर्षांपासून राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात येते. शिवाय यावेळी मुख्यमंत्र्यासह पूजेचा मान एका वारकरी दाम्पत्याला मिळतो. यंदा लातूरमधल्या हकनाकवाडीच्या फड दाम्पत्याला मानाचे वारकरी हा मान मिळाला.

पंढरपुरात मंत्रालयातल्या 'त्या' कर्मचाऱ्यांचा गौरव

Last Updated: Saturday, June 30, 2012, 10:55

मंत्रालयातील अग्नितांडवातून तिरंग्याचं सुरक्षितपणे रक्षण करणाऱ्या मंत्रालय कर्मचाऱ्यांचा सत्कार पंढरपुरात करण्यात आला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांचा गौरव केला.

‘याचसाठी केला अट्टहास...’

Last Updated: Saturday, June 30, 2012, 10:42

ज्या क्षणांची लाखो वारकरी वाट पाहत होते तो दिवस आज उगवलाय. पंढरपूरच्या सावळ्या विठूरायाच्या दारात उभं राहून साजरं रुप डोळ्यात साठवणं हे एका क्षणात वारीचं सार्थक झाल्यासारखं असतं. त्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल झालेत.

महाराष्ट्राच्या ‘बाबां’चं विठुरायाकडं साकडं...

Last Updated: Saturday, June 30, 2012, 11:03

शनिवारी मध्यरात्री मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते विठूरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली. मुख्यमंत्र्यांनी सपत्निक विठूरायाची पूजा केली. पांडुरंगाच्या पूजेनंतर रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न झाली.

पालख्या पंढरीच्या उंबरठ्यावर...

Last Updated: Friday, June 29, 2012, 10:44

सावळ्या विठूरायाच्या भेटीसाठी आतूर झालेल्या वारकऱ्यांचा मेळा आता पंढरपुरात दाखल होईल. आज वाखरीचा मुक्काम आटोपून सर्व पालख्या पंढरपूरकडे रवाना होतील.

राज ठाकरेंच्या पत्नी झाल्या वारकरी

Last Updated: Monday, June 18, 2012, 09:01

विठूरायाच्या भेटीसाठी सारे वारकरी आतुर झालेत.. मजल दरमजल करत वार-यांच्या दींड्या आणि पालख्या मार्गक्रमण करत आहेत. लहान थोर, आबालवृद्ध सारेच पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन झाले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी वारकरी झाल्या होत्या. त्यामुळे महिलांमध्ये उत्साह दिसून आला.

तुकोबांच्या पालखीचा मुक्काम सरकारवाड्यात

Last Updated: Sunday, June 10, 2012, 23:03

तरुणांनाही लाजवेल असा उत्साह आणि विठुरायाच्या भेटीची आस या वारक-यांमध्ये दिसतेय.. मंदिराच्या परिसरात पालखी दाखल झाली असून, मंदिर प्रदक्षिणेनंतर पालखीचा पहिला मुक्काम सरकारवाड्यात असणार आहे..

आनंदवारी

Last Updated: Saturday, June 30, 2012, 11:26

सुंदर तें ध्यान उभे विटेवरी | कर कटावरी ठेवूनियां || तुळसीहार गळा कासे पीतांबर | आवडे निरंतर तेंचि ध्यान || मकरकुंडले तळपती श्रवणी | कंठी कौस्तुभमणि विराजित || तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख | पाहीन श्रीमुख आवडीनें ||

वारक-यांचा आरोग्य विमा

Last Updated: Saturday, June 9, 2012, 16:18

आषाढी वारीत जमणा-या लाखो वारक-यांना समोर ठेवून एका विमा कंपनीनं आरोग्य विमा बाजारात आणलाय. वारीदरम्यान वारक-यास काही झाल्यास अवघ्या 30 रुपयांच्या प्रिमियमवर एक लाखांचे संरक्षण मिळणारा आहे.

भीषण राजकीय नाट्य- 'वार-करी'

Last Updated: Friday, November 18, 2011, 11:54

राज्य सांस्कृतिक संचालनालय आणि विशेष समाज कल्याण अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आयोजित राज्य नाट्य स्पर्धेत सध्याच्या राजकारणावर भाष्य करणारे सामाजिक आशयप्रधान ‘वार- करी’ हे नाटक बॉश फाईन आर्ट्सने सादर केले.